Skip to main content

Posts

Solapur Fraud: 'तलाठ्याच्या नोकरीचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक'; तब्बल २६.६१ लाख उकळले, तिघांविरुद्ध गुन्हा

सोलापूर : तलाठी म्हणून नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तिघांनी एका महिलेकडून २६ लाख ६१ हजार रुपये घेतले. नोकरीत वशिलेबाजी चालत नसतानाही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या महिलेनेही वेळोवेळी पैसे दिले. आता नोकरीही नाही आणि पैसेही परत देत नसल्याने विवाहितेने विजापूर नाका पोलिसांत धाव घेतली. विजयपूर रोडवरील चंडक मळा परिसरात राहायला असलेल्या अंजली सूर्यकांत शिवशरण (वय २८) यांना गौतम आप्पा शिंदे, सरोज गौतम शिंदे व रितेश गौतम शिंदे (तिघेही रा. उद्धवनगर भाग-२, ओम गर्जना चौक, विजयपूर रोड) या तिघांनी फसविले आहे. संशयितांनी अंजली शिवशरण यांना तलाठीपदावर नोकरी लावतो म्हणून विश्वास संपादन केला. त्यांच्यावर विश्वास ठेवून एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२५ या काळात शिवशरण यांनी संशयित आरोपींना रोखीने, ऑनलाइन स्वरूपात २६ लाख ६१ हजार ५०० रुपये दिले.

होर्डिंग हटविण्याची गती कासवाची

परी, ता. २५ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आयुक्तांनी हद्दीतील धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग तातडीने हटविण्याच्या स्पष्ट सूचना अनधिकृत बांधकाम व निमुर्लन विभागाला दिल्या. पाऊस जोरात पडत असताना ही प्रक्रिया मात्र अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अद्ययावत यंत्रणेचा अभाव असल्‍याने दिवसाला केवळ एक मोठे होर्डिंग हटविले जात आहे. हद्दीतील शेकडो धोकादायक होर्डिंग कधी हटविली जाणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. सध्याच्या स्थितीत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आषाढी वारीच्या काळात 'पीएमआरडीए'च्या हद्दीतील दोनशेपेक्षा जास्त होर्डिंग तातडीने हटविण्यात आली होती. त्यामुळे ही प्रक्रिया वेगाने होऊ शकते, हे वास्तव आहे. वारीनंतर मात्र ही गती नेहमीप्रमाणे संथ झाली आहे. आयुक्तांनी मोठी होर्डिंग अर्ध्यावर वाकवून, तातडीने काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनेक ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. --- एजन्सीसाठी नागरिकांच्या जिवाशी खेळ प्रशासकीय यंत्रणेकडून होर्डिंग हळूवारपणे काढली जातात. ही होर्डिंग पुन्...

पुणे: हॉटेल वैशाली, गुडलकनंतर पुण्यात अतिक्रमण विभागाची पुन्हा एकदा मोठी कारवाई

पुणे | सिंहगड रस्त्यावरील (Singhgad Road) माणिकवागे परिसरातील गोयलगंगा रस्त्यावर बेकायदेशीरपणे थाटण्यात आलेल्या चौपाटीवर महापालिकेने आज (९ मे) मोठी कारवाई केली. सुमारे ६ हजार चौरस फूट क्षेत्रावरील शेड्स, टेबल-खुर्च्या व अन्य पथारी साहित्य हटवण्यात आले असून ६ ट्रक सामान जप्त करण्यात आले आहे. या चौपाटीवर चायनीज, भेळ, पाणीपुरी, दाक्षिणात्य पदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर थाटले गेले होते. दुकानदारांनी दुकानासमोरील मोकळी जागा व्यापून टाकली होती. दुपारी व रात्री उशिरापर्यंत येथे प्रचंड गर्दी होत असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि स्थानिकांना त्रास होत होता. नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. (PMC Action on Illegal Encroachments at Manikbag) महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन विभाग व बांधकाम विभागाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली. गोयल गंगा रस्त्यासह पादचारी मार्ग, इमारतींच्या साइड मार्जिन आणि फ्रंट एरियातील अनधिकृत अतिक्रमण हटवण्यात आले. या कारवाईत अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाट...

पुणे महापालिकेत उपआयुक्त प्रतिभा पाटील यांचा मनमानी कारभार ? तक्रारकर्त्यांचे गंभीर आरोप

पुणे, दि. ३० एप्रिल: सध्या प्रशासक राज्यात असलेल्या पुणे महानगरपालिकेत उपआयुक्त श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते रमेश विष्णू खामकर यांनी नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत हे आरोप केले आहेत. खामकर यांच्या म्हणण्यानुसार, पुणे महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी मनमानी कारभार करत असून, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने निर्णय घेतले जात असून, वरिष्ठ नागरिकांनाही अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. खामकर यांनी उपआयुक्त पाटील यांच्यावर खालीलप्रमाणे आरोप केले आहेत: अनधिकृत मुदतवाढ: शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या श्रीमती पाटील यांनी मनमानी पत्रव्यवहार करून पुणे महानगरपालिकेत आपली नियुक्ती दोन वर्षांनी वाढवून घेतली असून, त्यांनी ४ वर्षांहून अधिक कालावधी सेवा बजावलेली आहे. महत्त्वाच्या खात्यांवर नियंत्रण: मालमत्ता, भूसंपादन, सामान्य प्रशासन व कर विभाग यांसारख्या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या खात्यांचा पदभार श्रीमती...

अनामत रकमेवरून वाद – तनिषा भिसे प्रकरणानंतर पुणे महापालिकेचे परिपत्रक, 'आयएमए'कडून विरोध

मुंबई | ११ एप्रिल – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अनामत रक्कम नसल्यामुळे तनिषा भिसे या रुग्णाला दाखल करण्यास नकार दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांकडून अनामत रक्कम मागू नये, असे स्पष्ट आदेश परिपत्रकाद्वारे जाहीर केले. मात्र महापालिकेच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) तीव्र विरोध दर्शवला आहे. आयएमएने स्पष्ट केलं की, लहान व मध्यम प्रकारच्या रुग्णालयांचा आर्थिक भार मोठा असतो, त्यामुळे अशा रुग्णालयांनी अनामत रक्कम मागणे ही गैर बाब नाही. धर्मादाय रुग्णालयांना सरकारकडून मिळणाऱ्या सवलतींच्या बदल्यात अनामत रक्कम मागू नये, हे मान्य असले तरी सर्व रुग्णालयांना एकाच निकषावर तोलणे योग्य नाही, असे आयएमएचे म्हणणे आहे. आयएमएच्या मते, देशातील ७० टक्के नागरिकांना लहान आणि मध्यम रुग्णालयांकडूनच सेवा मिळते. या रुग्णालयांनी अनामत रक्कम मागू नये, असा आग्रह धरणे हे अन्यायकारक ठरेल. त्यामुळे या प्रकारच्या रुग्णालयांसाठी स्वतंत्र धोरण तयार करणे गरजेचे असल्याचेही आयएमए...

आता सगळीकडे आधार कार्ड न्यायची गरज नाही, सरकारने लॉंच केलेलं नवीन 'आधार अ‍ॅप' काय आहे ?

हिंदुस्थाना आधार कार्ड हे महत्त्वाचे डॉक्यमेंट आहे. देशातील 90 टक्क्याहून अधिक लोकांकडे आधार कार्ड आहे. सिम कार्ड घेण्यापासून ते शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आधार कार्डचा वापर होतो. इतकंच नाही तर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही आधारचा वापर होतो. आता हे आधार कार्ड खिशात घेऊन फिरण्याची गरज नाही. एका क्यु आर कोडमुळे तुमचे आधार व्हेरिफिकेशन होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार तुम्हाला आधारचे नवीन अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. या अ‍ॅपमधून तुम्हाला एक QR कोड स्कॅन करावा लागणार आहे. कोड स्कॅन केल्यानंतर तुमचे फेस ऑथेंटिकेशन होईल. इतकंच नाही तर तुमची जेवढी माहिती तुम्हाला शेअर करायची आहे तेवढीच माहिती शेअर करता येणार आहे. हे अ‍ॅप वापरल्यानंतर तुम्हाला ना आधारकार्ड घेऊन फिरावं लागणार आहे ना त्याची झेरॉक्स कॉपी. पहा व्हिडिओ New Aadhaar App Face ID authentication via mobile app ❌ No physical card ❌ No photocopies 🧵Features👇 pic.twitter.com/xc6cr6grL0 — Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) April 8, 202...

ई-सेवा केंद्रांना 'हॉलिडे'! १४ एप्रिलपर्यंत सेवा ठप्प; नागरिकांची गैरसोय अटळ

मुंबई, ११ एप्रिल: महाराष्ट्र सरकारचे 'आपले सरकार' (Aaple Sarkar) ई-सेवा केंद्र आजपासून पुढील पाच दिवसांसाठी, म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. महा ऑनलाइनच्या सर्व्हरवर नियमित देखभाल व तांत्रिक सुधारणा करण्यासाठी ही सेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आपले सरकार पोर्टल हे राज्यातील नागरिकांसाठी अनेक शासकीय सेवांचा महत्त्वाचा दुवा ठरले आहे. उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्र, जात पडताळणी, दुकान परवाना यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे याच पोर्टलच्या माध्यमातून मिळतात. तसेच, विविध सरकारी योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही या पोर्टलद्वारे पार पाडली जाते. या पाच दिवसांच्या कालावधीत पोर्टल बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना, नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना, तसेच अन्य शासकीय कागदपत्रांची गरज असलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ई-सेवा केंद्रांमध्ये नेहमी प्रमाणे सेवा मिळणार नसल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. शासनाकडून सांगण्यात आले आहे की, या काळात काही तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील आण...