पुणेः पुणे महानगरपालिका मधील मनपा शाळांमध्ये आज शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
सर्व मुलांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी गुलाबाचे फुल देऊन तसेच नवीन शैक्षणिक वर्षाची पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
आजच्या दिवशी शाळेची फुले, पताका, रांगोळी याद्वारे सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाच्या माध्यमातून गाणी, गोष्टी, खेळ या अनुषंगाने पहिला दिवस आनंददायी पद्धतीने साजरा करण्यात आला.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. पहिल्याच दिवशी पुस्तके प्राप्त झाल्याने सर्व विद्यार्थी आनंदात असल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.
दोन महिन्यापासून सुट्टीमुळे शांत असलेली शाळा, मुलांच्या किलबिलटाने प्रसन्न झाली शाळेतील वातावरण भारावून गेल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले.
पुणे महानगरपालिकेच्या मा. प्रशासकीय अधिकारी सौ. सुनंदा वाखारे मॅडम यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले व नवीन शैक्षणिक वर्षात पुढील वाटचालीसाठी विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक व पालक यांना शुभेच्छा दिल्या व स्वागत केले
अशी माहिती शिक्षण विभागाचे सहायक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर यांनी दिली.
PMC School gives Quality Education 👌
ReplyDelete