Skip to main content

मैंदर्गी: नगरपरिषद गप्प, नागरिक संतप्त! – पाणीटंचाईवर प्रशासनाचे दुर्लक्ष; वरच्या गल्लीतील नागरिक तहानलेलेच! – १५ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प - व्हिडिओ

मैंदर्गी: मैंदर्गी नगरपरिषद हद्दीतील वरच्या गल्लीमध्ये मागील 15 दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णतः बंद आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.

नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा बेजबाबदारपणा आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः नगरोत्सव अभियानाचे काम सुरू असल्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेत अडचण निर्माण झाली आहे. मात्र, या अभियानाच्या कामास 18 महिने कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी काय पाणी प्यायचे, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

पहा व्हिडिओ 

यासंदर्भात आयुब लुकुडे यांनी वारंवार नगरपरिषद कार्यालयात जाऊन तक्रारी केल्या असल्या तरी प्रशासनाने कोणतेही ठोस नियोजन केलेले नाही. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित उपाययोजना कराव्यात व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

नागरिकांची ही समस्या लवकरात लवकर सोडवली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments

  1. Jab tak nagarpalika me election
    Nahi hoga aise hi chlta rahega
    Maidargi co 5% khan se milega
    10 parentage khanse mile yehi sochte hain public marne do koi fark nahi padega

    ReplyDelete

Post a Comment