सरकारी योजनांचा गाजावाजा मोठा, पण प्रत्यक्ष लाभ मर्यादित! शहरातील महत्त्वाची रुग्णालये योजना बाहेर, सामान्य नागरिकांचे काय? आयुष्मान कार्ड आहे, पण उपचारासाठी रुग्णालये कुठे? शहरातील महत्त्वाची रुग्णालये योजना बाहेर
पुणे: प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अपुऱ्या रुग्णालयांच्या सहभागामुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी अडचणी येत असल्याचे चित्र आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात या योजनेंतर्गत केवळ ८२ रुग्णालयांचा समावेश आहे, त्यातील खासगी रुग्णालये फक्त १५ ते १६ असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून वारंवार आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे आवाहन केले जात आहे, मात्र ही कार्डे चालणारी रुग्णालयेच अपुरी असल्याने रुग्णांनी उपचार कोठे घ्यायचे? असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.
महत्त्वाच्या रुग्णालयांचा समावेश कधी?
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वी उत्पन्न आणि रेशन कार्डाची मर्यादा होती. मात्र, आता कोणत्याही उत्पन्न गटातील नागरिकांना ही योजना लागू करण्यात आली आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्यास, रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकतात.
तथापि, शहरातील प्रमुख रुग्णालयांचा अद्याप यामध्ये समावेश नाही, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे. वाढत्या खासगी रुग्णालयांच्या जाळ्यात सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आरोग्य हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
योजना प्रभावी ठरत नाही?
गेल्या वर्षी शासनाने या योजनांमध्ये नव्याने आजारांच्या यादीत भर घातली.
महात्मा फुले योजनेत ९९६ आजारांचा समावेश असून, १.५ लाख रुपयांपर्यंत मदत मिळते.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १३५० आजारांचा समावेश असून, ३.५ लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते.
मात्र, पर्याप्त रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसल्याने योजनांचा प्रत्यक्ष फायदा होत नाही, अशी नागरिकांची भावना आहे. शासनाने या योजनांचा व्यापक प्रसार आणि जास्तीत जास्त रुग्णालयांचा समावेश करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
Moin chaudhary sir good work. Sarkar ne 5 lakh ki yojna to di he magar yojna ka fayda uthne ke liye Private hospital hi nahi diye he,
ReplyDeletehum sarkar se request karte he ki woh jald se jald private hospitalo me is yojna ki shuruwat kare taki aam janta is yojna se laabh le sake.
भाई भोहात बडिया काम हे तुम्हारा 👌👌👌
ReplyDelete