पुण्यात सोशल मीडियावर औरंगजेब प्रकरण तापले; धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी येरवडा, खडक आणि बंडगार्डन हद्दीत गुन्हे नोंद
पुणे – औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभरात निर्माण झालेला वाद अद्याप शांत झालेला नाही. नागपुरात झालेल्या दंगलीनंतर आता पुण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. औरंगजेबाचे फोटो आणि वादग्रस्त रील्स पोस्ट केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
येरवड्यात सोशल मीडिया पोस्टवरून गुन्हा
येरवड्यातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट केल्याचा आरोप आहे. इन्स्टाग्रामवर औरंगजेबासंदर्भातील तीन वादग्रस्त रील्स तयार करून त्या पोस्ट केल्या. या रील्समध्ये आक्षेपार्ह मजकूर असून, थोर व्यक्तींना लक्ष्य केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपीने समाजात धार्मिक तेढ आणि दुही निर्माण करण्याच्या उद्देशाने अनुचित चॅटिंगही केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना २१ मार्च २०२५ रोजी उघडकीस आली असून, २२ मार्च रोजी रात्री १२.५६ वाजता अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला. बशीद शेख असे आरोपीचे नाव आहे.
खडक परिसरात औरंगजेबाचे फोटो पोस्ट; तीन जणांवर गुन्हा
पुणे शहरातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चमनशहा दर्गा परिसरात औरंगजेबाचे फोटो आणि वादग्रस्त कॅप्शनसह इन्स्टाग्राम पोस्ट केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पोस्टमुळे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा तसेच हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हेमंत गायकवाड यांनी तक्रार दाखल केली असून, आरोपींमध्ये इरफान खान आणि शेख अर्ब यांचा समावेश आहे.
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक प्रकार
तिसऱ्या घटनेत बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने विशिष्ट व्यक्तीचे फोटो आणि गाणे वापरून इन्स्टाग्रामवर पोस्ट करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. तसेच यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणात विक्रम प्रेमचंद सोहेल शेख (वय ३५, रा. ताडीवाला रोड, कृष्णा हट्टी चौक, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारांमुळे पुण्यातील सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असून, पोलिसांकडून या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट आणि सोशल मीडिया सामग्रीवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
What about Nitesh Rane and others?
ReplyDeleteWoh kare toh pyar, dusre kare toh balatkar😡🤬
Kanoon sab ke liye ek jaisa hona chahiye, jo gunhegar hai unhe saza do. Lekin insaaf ke sath...