Skip to main content

पाण्याचे फुगे, रंग फेकणे, अश्लील बोलणे महागात पडणार; मस्तीत पण शिस्तीत सण साजरा करा, पुणे पोलिसांचा इशारा

पुणे: होली हैं… बुरा ना मानो होली हैं… म्हणत कोणावरही साध्या पाण्याचे किंवा रंगमिश्रित पाण्याचे फुगे मारणे, महिला-तरुणींना पाहून अश्लील भाष्य, कृत्य करणे महागात पडू शकते. होळी आणि धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटा, पण शिस्तीचे पालन करा.

रंगाचा बेरंग करताना कोणी सापडला तर क्षमा केली जाणार नाही, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.

सण साजरा करताना कोणालाही त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. नियम पायदळी तुडवू नका, जाणीवपूर्वक कोणी मस्ती करताना सापडलाच तर कारवाई अटळ आहे. दारू ढोसून गाडय़ा चालवू नका, बेकायदेशीर दारूची तस्करी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कायदामोडणाऱ्यांवर कठोरकारवाई

सार्वजनिक ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात असणार आहेत. गस्ती पथके, नाकाबंदी आणि 'ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह'विरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

Comments

  1. खराडी भागात उद्या एक होळी इव्हेंट होणार आहे. त्या इव्हेंट मध्ये बेकायदेशीर दारू सिगारेट अशे अंमल पदार्थी विक्री होणार आहे. इव्हेंट मध्ये 17-18वर्षाच्या मुलाचा सुद्धा समावेश असू शकतो तरी आपण ते थांबवण्यास प्रयत्न करावे नम्र विंनती 🙏

    ReplyDelete

Post a Comment