Skip to main content

Ration-Gas cylinder rules:27 मार्चपासून रेशन कार्ड-सिलिंडरच्या नियमांमध्ये काय होणार बदल, जाणून घ्या

Gas cylinder and ration card rules change : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने रेशन कार्ड आणि गॅस सिलिंडरसंबंधित वितरणाबाबत काही महत्त्वाचे बदल करण्यात येत आहेत. ज्यामुळे देशातील कोट्यावधी ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 27 मार्चपासून रेशनकार्ड आणि गॅस सिलिंडर वितरणाच्या नियमांमध्ये होणाऱ्या या बदलांचा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. चला तर जाणून घेऊया नवीन नियमानुसार काय बदल होणार आहेत..! त्याचा नेमका फायदा अन् तोटा कोणाला होणार आहे. सरकारने हा निर्णय नेमकं का घेत आहेत...!

रेशन कार्डमध्ये बदल
रेशनकार्डशी संबंधित नवीन प्रणालीचा मुख्य उद्देश वितरणात पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवणे आहे.
27 मार्चपासून लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, आता डिजिटल रेशन कार्ड जारी केले जातील, ज्यामुळे रेशन वितरण अधिक पारदर्शक होईल.
'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' ही प्रणाली लागू केली जाईल, जी विशेषतः स्थलांतरित कामगारांसाठी उपयुक्त ठरेल.
या प्रणालीअंतर्गत, कोणतीही व्यक्ती देशाच्या कोणत्याही भागातून रेशन घेऊ शकेल.
रेशनकार्डधारकांना ओळख पटविण्यासाठी आणि बनावट लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागेल.

गॅस सिलिंडर संदर्भात नवीन प्रणाली
गॅस सिलिंडरच्या वितरणातही बदल केले जात आहेत.
आता गॅस सिलेंडर बुकिंगसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली जाईल
आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे आवश्यक असेल.
याशिवाय, गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरी दरम्यान ओटीपी पडताळणी देखील अनिवार्य केली जाईल.
गॅस सबसिडीच्या नियमांमध्येही बदल शक्य आहेत आणि एका महिन्यात उपलब्ध असलेल्या सिलिंडरच्या संख्येवरही नवीन नियम लागू होऊ शकतात.

सिलिंडरमध्ये स्मार्ट चिप्स बसवली जाणार
या बदलाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गॅस सिलिंडरमध्ये स्मार्ट चिप्स बसवणे, जे वितरणाच्या स्थितीवर लक्ष ठेवतील आणि पारदर्शकता सुनिश्चित केली जाऊ शकते. हे बदल 27 मार्चपासून लागू होऊ शकतात, जरी अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Comments

  1. Can't the cylinder be made of lighter fabric? In this advance age why can't our engineers cone up with something lighter. Women use it mostly...please find an easier way!

    ReplyDelete

Post a Comment