Skip to main content

पुणे: धक्कादायक! मैत्रीचा फसवणुकीसाठी वापर — कॉफीत गुंगीचे औषध टाकून ६ लाखांचा गंडा

पुणे : मैत्री कशी असावी याविषयी नेहमीच चर्चा होते. एकदा आपण मैत्री केली की ती शेवटपर्यंत आपण टिकवून ठेवतो. जेव्हा आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपली गरज असते तेव्हा आपण त्यांच्यासाठी धावून येतो.

मैत्रिचं नातं हे कधीच एकतर्फी नसतं त्यात दोन मित्रांना नेहमीच मेहनत घ्यावी लागते. दरम्यान, आता एक अशी घटना घडली आहे जी पाहता तुम्हाला देखील आश्चर्य होईल. चक्क मैत्रिणीला कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून तरुणीने सोन्याचे दागिने चोरल्याची बातमी समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सगळी घटना 6 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजता पुण्यातील सिंहगड कॉलेज जवळ असलेल्या एमराईड सोसायटी मध्ये घडली. फिर्यादी तरुणी ही तिच्या घरी असताना तिची मैत्रीण घरी आली. यावेळी तिनी येताना कोल्ड कॉफी सोबत आणली आणि ती तिने मैत्रिणीला ती प्याला दिली. आता आपल्याच मैत्रिणीनं कोल्ड कॉफी आणली त्यामुळे कुठला ही विचार न करता फिर्यादी तरुणी ती कॉफी प्यायली. 

कोल्ड कॉफीमध्ये दिलं गुंगीचे औषध 
दरम्यान, याच कोल्ड कॉफीमध्ये आरोपी तरुणीने गुंगीचे औषध मिसळले होते. गुंगीचे औषध मिळाल्यामुळे फिर्यादी मुलगी ही बेशुद्ध पडली. याचाच फायदा मैत्रिणीनं घेतला आणि थेट बेडरूममध्ये जाऊन कपाटाचे ड्रॉव्हरमध्ये असलेले 5 लाख 46 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून तिने तिथून पळ काढला. ही सगळी घटना पुण्यातील आंबेगाव भागात घडल्याचं समोर आलं आहे.

आपले दागिने हे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिनं याबाबतची चौकशी मैत्रिणीकडे केली. त्यानंतर आपणच तुझ्या घरात चोरी केल्याची कबुली दिली आणि दागिने परत करते असं आश्वासन दिलं. मात्र, वारंवार विचारून सुद्धा मैत्रिणीनं दागिने परत न दिल्यामुळे तरुणीनं भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मधील कर्मचारी आरोपी तरुणीचा शोध घेत असताना ही तरुणी पुणे स्टेशन येथे असल्याचे त्यांना कळले. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले व तिच्याकडुन फिर्यादी यांचे चोरी केले सोन्याचे दागिने जप्त केले. ज्या मुलीनं ही चोरी केली त्या मुलीचं नाव ऐश्वर्या संजय गरड असं असून ती 25 वर्षांची आहे.

Comments