पुणे : कोंढवा परिसरात परवानगीशिवाय बांधकामे करणे, एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री करणे आणि वेळेत फ्लॅटचा ताबा न देता ग्राहकांची फसवणूक करणे, या गंभीर आरोपांखाली पोलिसांनी नामांकित बांधकाम व्यावसायिक नवनाथ महादेव माने (वय ४५, रा. गंजपेठ, पुणे) याला अटक केली आहे.
कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने याने मलिकनगर, साईबाबानगर, भाग्योदयनगर, मिठानगर, शिवनेरीनगर या भागांत महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अवैध बांधकामे केली होती. या प्रकरणी पुणे महापालिकेने त्याच्याविरोधात अनेक वेळा गुन्हे दाखल केले होते. परंतु, तो परत-परत अवैध बांधकामे सुरू करत होता. यावरून महापालिकेच्या अभियंत्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला.
मानेने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता, मात्र तो न्यायालयाने फेटाळला. तसेच, साईबाबानगरमधील इमारत पाडताना स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेतल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.
याशिवाय, एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री करणे, ठरलेल्या वेळेत ताबा न देणे आणि ग्राहकांना दमदाटी करणे यासारख्या तक्रारींचाही समावेश असून, या पार्श्वभूमीवर आधी नोंदवलेल्या गुन्ह्यात नव्याने कलमांची वाढ करण्यात आली आहे.
सध्या पोलिसांनी माने याला अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Sirf Navnath Mane akela builder nahi hai Kondhwa me. Aur bhi saikdon builders hai, Jo illegal construction bisiyon salon se karte aa rahe hai aur kar rahe hai, un sab par action hona chahiye.
ReplyDeleteBuilders ke hafte jaate hai carporators ko aur dusre officers ko.