हिंदुस्थाना आधार कार्ड हे महत्त्वाचे डॉक्यमेंट आहे. देशातील 90 टक्क्याहून अधिक लोकांकडे आधार कार्ड आहे. सिम कार्ड घेण्यापासून ते शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आधार कार्डचा वापर होतो.
इतकंच नाही तर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही आधारचा वापर होतो. आता हे आधार कार्ड खिशात घेऊन फिरण्याची गरज नाही. एका क्यु आर कोडमुळे तुमचे आधार व्हेरिफिकेशन होणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार तुम्हाला आधारचे नवीन अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. या अॅपमधून तुम्हाला एक QR कोड स्कॅन करावा लागणार आहे. कोड स्कॅन केल्यानंतर तुमचे फेस ऑथेंटिकेशन होईल. इतकंच नाही तर तुमची जेवढी माहिती तुम्हाला शेअर करायची आहे तेवढीच माहिती शेअर करता येणार आहे. हे अॅप वापरल्यानंतर तुम्हाला ना आधारकार्ड घेऊन फिरावं लागणार आहे ना त्याची झेरॉक्स कॉपी.
पहा व्हिडिओ
New Aadhaar App
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) April 8, 2025
Face ID authentication via mobile app
❌ No physical card
❌ No photocopies
🧵Features👇 pic.twitter.com/xc6cr6grL0
Comments
Post a Comment