Weather Update l राज्यात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत चालला असतानाच हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. ८ एप्रिल रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांपेक्षा जास्त नोंदवण्यात आले आहे.
दुसरीकडे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Pune weather update)
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाला विश्रांती मिळाल्यानंतर उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. यामुळे शेतकरी, कामगार, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पुण्यात उष्णतेचा पारा ४१ अंशांवर पोहोचणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यात आज कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. उकाडा इतका वाढला आहे की, दुपारनंतर रस्त्यावर वावरणे कठीण झाले आहे. आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांनी सकाळी किंवा संध्याकाळी घराबाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. (Pune weather update)
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तापमानाचा अंदाज कमाल 39 अंश आणि किमान 23 अंश सेल्सिअस इतका आहे. ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातही उन्हाचा जोर कायम आहे. आज कमाल तापमान 40 अंश, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अत्याधिक उन्हाच्या वेळी काम टाळण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. (Solapur weather update)
तसेच सांगली जिल्ह्यातील तापमान सोलापुरासारखेच असून, कमाल 40 अंश तर किमान 25 अंश इतके राहणार आहे. हवेत आर्द्रता वाढल्यामुळे काही भागांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Sangli weather update)
याशिवाय कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. येत्या काही तासांत पावसाची शक्यता असून, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Kokan weather update)
Everybody should take care before going to outside
ReplyDelete