पुणे: गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; डॉक्टरांच्या खाजगी क्लिनिकवर भाजप महिला मोर्चाची तोडफोड - व्हिडिओ
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला आहे. रुग्णालयातील डॉक्टरांवर २० लाखांची मागणी केल्याचा आरोप होत असून, संबंधित डॉक्टर सुकृत घैसास यांच्या खाजगी क्लिनिकची तोडफोड भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
ही कारवाई भाजपा महिला मोर्चाच्या पुणे शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. घैसास यांचे खाजगी क्लिनिक हेच रुग्णालयाच्या मागील बाजूस असल्याने या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पहा व्हिडिओ
Link source: Pune prime news
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही गटांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन करत निषेध व्यक्त केला. काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर चिल्लर फेकून निषेध केला, तर युवक काँग्रेस आणि पतित पावन संघटनेकडून रुग्णालयाच्या फलकावर काळं फासून विरोध नोंदवण्यात आला. संबंधित रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने भरपाईच्या २० लाख रुपयांची मागणी करत उपचार सुरु करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीचा योग्यवेळी उपचार न झाल्यामुळे मृत्यू झाला, असा आरोप करण्यात येत आहे.
या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून, रुग्णालय प्रशासन व संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
अजून करायला पाहिजेल dr ला धरून मारलं पाहिजेल
ReplyDelete💯