Skip to main content

पूणे: दीनानाथ मंगेशकर रूग्णालय: गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी समितीचा रिपोर्ट आला; डॉ. घैसास दोषी, २ दिवसांत कारवाई होणार - वाचा सविस्तर

पुणे: गर्भवती महिलेच्या मृत्यूचं खापर डॉ. केळकर (Dr. Kelkar) यांनी राहु-केतुवर फोडलं होतं. तनिषा भिसे (Tanisha Bhise) मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढल्या आहेत.

धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर दोषी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता मंगेशकर रूग्णालय प्रशासनात (Dinanath Mangeshkar Hospital) मोठी खळबळ उडाली आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आता समोर आलाय. पन्नास पानांचा अहवाल सादर केला गेलाय.

तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, त्यादिवशी 7 कोटी 47 लाख रूपये रक्कम मंगेशकर रूग्णालयाकडे शिल्लक होती. जी निर्धण किंवा अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींच्या उपचारासाठी आहे. धर्मादाय आयुक्तालयाची पाचजणांची समिती (Pune News) होती. हा अहवाल दोन दिवस आणि एक रात्र असं सलग बसून बनवण्यात आलाय. काल सकाळी हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. या अहवालात डॉ. केळकर जे डीन आणि संचालक आहेत, तेही दोषी आढळून आलेत. त्यांचं स्टेटमेट देखील धर्मादाय आयुक्तालयाने रेकॉर्ड केलेलं आहे.

तनिषा भिसे यांच्या पतीचं देखील स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलंय. डॉ. घैसास हे या सगळ्या प्रकरणाला जबाबदार आहेत. कारण त्यांनी हे डिपॉझिट मागितलं होतं. ते राहु-केतु वैगेरे. त्यांना काय सुचलं, अशी भूमिका डॉ. केळकर यांची होती. ती देखील धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात जशीच्या तशी मांडण्यात आली. परंतु डॉ. केळकरांच्या संमतीशिवाय हे झालेलं नाही. डॉ. केळकर आणि संपूर्ण मंगेशकर रूग्णालय व्यवस्थापन हेच याला जबाबदार आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आलाय.

रूग्णालयासंदर्भात काय-काय करायला हवं, यासंदर्भात देखील धर्मादाय आयुक्तांनी शिफारशी मांडल्या आहेत. यामध्ये मंगेशकर रूग्णालयाचं जे नाव आहे. त्यात धर्मादाय शब्द असणे, आधीपासून गरजेचे होते. तो शब्द असेल. तर केवळ पुणेच नाही तर राज्यातील सर्व चॅरिटेबल रूग्णालयांच्या नावात धर्मादाय शब्द येणार आहे. डॉ. केळकर हे डॉ. घैसास इतकेच जबाबदार असल्याचं समोर आलाय.

मातामृत्यू समितीचा अहवाल समोर आला नाही. तो उद्या सकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. फौजदारी समितीचा अहवाल समोर आल्यावर गुन्हा दाखल होवू शकतो. डॉ. केळकर यांनी नियमावलीनुसार ज्या गोष्टी करणं गरजेचं होतं. त्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत.

Comments