Solapur Fraud: 'तलाठ्याच्या नोकरीचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक'; तब्बल २६.६१ लाख उकळले, तिघांविरुद्ध गुन्हा
सोलापूर : तलाठी म्हणून नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तिघांनी एका महिलेकडून २६ लाख ६१ हजार रुपये घेतले. नोकरीत वशिलेबाजी चालत नसतानाही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या महिलेनेही वेळोवेळी पैसे दिले.
आता नोकरीही नाही आणि पैसेही परत देत नसल्याने विवाहितेने विजापूर नाका पोलिसांत धाव घेतली.
विजयपूर रोडवरील चंडक मळा परिसरात राहायला असलेल्या अंजली सूर्यकांत शिवशरण (वय २८) यांना गौतम आप्पा शिंदे, सरोज गौतम शिंदे व रितेश गौतम शिंदे (तिघेही रा. उद्धवनगर भाग-२, ओम गर्जना चौक, विजयपूर रोड) या तिघांनी फसविले आहे. संशयितांनी अंजली शिवशरण यांना तलाठीपदावर नोकरी लावतो म्हणून विश्वास संपादन केला. त्यांच्यावर विश्वास ठेवून एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२५ या काळात शिवशरण यांनी संशयित आरोपींना रोखीने, ऑनलाइन स्वरूपात २६ लाख ६१ हजार ५०० रुपये दिले.
Comments
Post a Comment